Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे १२ रुग्ण

cooking hands handwashing health

Photo by Burst on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १२ रुग्ण आढळले, तर ३ रुग्ण करोनामुक्त झाले.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (१ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या दोघांसहह एकूण १२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या ३० असून आतापर्यंत ५१ हजार ७६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २५४ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, कणकवली ३, कुडाळ १, मालवण १, सावंतवाडी १, वेंगुर्ले ५.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग १, कणकवली ७, कुडाळ २, मालवण ३, सावंतवाडी ४, वैभववाडी ०, वेंगुर्ले ७, जिल्ह्याबाहेरील ०.

एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६४ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version