कोकण मीडियाचे प्रमोद कोनकर यांच्यासह २० पत्रकारांना ‘दर्पण’ पुरस्कार

रत्नागिरी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधिक संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्काराकरिता कोकण विभागातून साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्यासह २० जणांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांचे हे पुरस्कार येत्या गुरुवारी, ६ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे उभारण्यात आलेल्या ‘दर्पण’ सभागृहात होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.

मुंबईतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि वृत्तवाहिन्यांमधून काम केल्यानंतर आरोग्य सेवेसाठी झोकून देऊन काम करणारे मंगेश चिवटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे २०२० चे तर सीएनएन१८ च्या मुंबई ब्युरो चीफ विनया देशपांडे-पंडित आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकण विभागीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

योगेश वसंत त्रिवेदी मंगेश चिवटे विनया देशपांडे-पंडित प्रमोद कोनकर

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या सन २०१९ आणि २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात लोकमत (कोल्हापूर) चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 अन्य विभागवार जाहीर केलेले २०२० चे ‘दर्पण’ पुरस्कार असे – १) मराठवाडा विभागातून आनंद कल्याणकर, नांदेड (आकाशवाणी प्रतिनिधी नांदेड), २) विदर्भ विभागातून डॉ.रमेश गोटखडे, अमरावती (स्तंभलेखक, दै.हिंदुस्थान अमरावती), ३) पश्चिम महाराष्ट्रातून विनोद शिरसाठ (पुणे), ज्येष्ठ समाजवादी लेखक व संपादक, हीरक महोत्सवी सा.साधना (पुणे), ४) उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून मिलिंद सदाशिव चवंडके, पत्रकार, अहमदनगर. ५) कोकण विभागातून प्रमोद कोनकर, हिंदुस्थान समाचार, कोकण मीडिया समाज माध्यम रत्नागिरी, ६) मुंबई विभागातून रवींद्र तुकाराम मालुसरे, संपादक, सा.पोलादपूर अस्मिता व अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई. ७) महिला विभागातून सौ.नम्रता आशीष फडणीस, विशेष प्रतिनिधी, दै.लोकमत, पुणे. विशेष ‘दर्पण’ पुरस्कार : १) शिवाजी पाटील, प्रतिनिधी, दै.लोकमत, मु. पो. तारळे खुर्द, ता.राधानगरी (कोल्हापूर), २) अ‍ॅड.बाबुराव तुकाराम हिरडे, संपादक, सा.कमला भवानी संदेश, करमाळा (सोलापूर), ३) प्रा. रमेश आढाव, तालुका प्रतिनिधी, दै.तरुण भारत, फलटण (सातारा).

गेल्यावर्षी जाहीर केलेले सन २०१९ चे पुरस्कार करोनाच्या परिस्थितीमुळे समारंभपूर्वक देता आले नाहीत. आता सन २०१९ आणि २०२० चे पुरस्कार राज्य शासनाच्या करोनाविषयक निर्देशानुसार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी समारंभपूर्वक देण्यात येतील. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख  २,५०० रुपये, सन्मानपत्र, जांभेकरांचे चरित्र ग्रंथ, जांभेकरांचे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्य यावरील माहितीपट (सीडी), शाल, श्रीफळ असे आहे.

संस्थेने जाहीर केले २०१९ चे दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकार असे – ज्येष्ठ संपादक पुरस्कार – शिवाजीराव अमृतराव शिर्के (संस्थापक संपादक, साप्ताहिक पवनेचा प्रवाह, पुणे), दर्पण पुरस्कार ‘कोकण विभाग’ – संतोष कुलकर्णी (प्रतिनिधी, दैनिक सकाळ, देवगड), श्रीमती विनया देशपांडे (ब्युरो चीफ, सीएनएन न्यूज 18, मुंबई), उत्तर महाराष्ट्र विभाग – निशांत दातीर (संपादक, निशांत / संत नगर टाइम्स, अहमदनगर), पश्चिम महाराष्ट्र विभाग – गुरुबाळ माळी (प्रतिनिधी, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – दयानंद जडे (संपादक, दैनिक लातूर समाचार, लातूर), विदर्भ विभाग – अनिल जुगलकिशोरजी अग्रवाल (संपादक, दैनिक मातृभूमी व दैनिक अमरावती मंडळ, अमरावती), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत धाडसी पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार – राहुल तपासे (प्रतिनिधी, एबीपी माझा, सातारा), विशेष दर्पण पुरस्कार – सुभाष भांबुरे (प्रतिनिधी, दैनिक पुण्यनगरी, फलटण), जयपाल पाटील (संपादक, साप्ताहिक रायगडचा युवक, अलिबाग).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply