pexels-photo-4031867.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३ जानेवारी) करोनाच्या नव्या बाधितांमध्ये किंचित घट नोंदविली गेली. आज नवे ९ रुग्ण आढळले, तर २ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या १०६ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार २५६ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६५९ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी घटून ९६.७२ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १२२ पैकी ११४ निगेटिव्ह, तर ८ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १२५ पैकी १२४ नमुने निगेटिव्ह, १ पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ६३ हजार ४४२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १०६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ७५, तर लक्षणे असलेले ३१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७५, तर संस्थात्मक विलगीकरणात ३१ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १९, तर डीसीएचमध्ये १२ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही किंवा अतिदक्षता विभागात दाखल नाही.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९१ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७९, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९०).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. २ जानेवारी) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत १२ जणांनी पहिला, तर ३७ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ४९ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख १० हजार ७११ जणांचा पहिला, तर ६ लाख ७८ हजार १४७ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १६ लाख ८८ हजार ८५८ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply