Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ८९ सक्रिय रुग्ण

hand holding petri dish

Photo by Anna Shvets on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे ५० रुग्ण बरे वाटल्याने घरी गेले असून ८९ रुग्ण सक्रिय असल्याने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, आज नवे ३ रुग्ण आढळले. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी त्याबाबतचा अहवाल दिला आहे.

अहवालानुसार आज (दि. ५ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ११६ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८९ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही किंवा चिंताजनक अवस्थेतही नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ३७२ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५२७ एवढीच आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग ०, कणकवली ०, कुडाळ १, मालवण २, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग २, कणकवली ४, कुडाळ २३, मालवण ३१, सावंतवाडी ९, वैभववाडी १, वेंगुर्ले १०, जिल्ह्याबाहेरील ५.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१९, कुडाळ – २५४, मालवण – २९९, सावंतवाडी – २१६, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version