महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील महिलांसाठी उपक्रम

ठाणे : येथील राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने १ मे रोजी होणार असलेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त फक्त महिलांसाठी मी राज्ञी स्वाभिमानी महाराष्ट्राची ही ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे. ठाणे जिल्हा (नवी मुंबईसह), मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर या कार्यक्षेत्रातील महिला स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
ही स्पर्धा महाराष्ट्र साहित्य सौरभ, चित्रमय महाराष्ट्र आणि वेशभूषा अशा तीन विभागात घेण्यात येईल. महाराष्ट्र साहित्य सौरभ स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि महिला या विषयावर ८०० ते १००० शब्दांत मराठी भाषेतील लेख पाठवावा. ललित, चिंतनपर, स्फुट, कथा, संवादात्मक असे साहित्य प्रकार यात अपेक्षित आहेत.
चित्रमय महाराष्ट्र स्पर्धेत चित्रकलेला वाव देण्यात आला आहे. महाराष्ट्राला एक सांस्कृतिक परंपरा आहे. इतिहास आहे. निसर्गाची देणगी आहे. ज्या गोष्टींमुळे राज्याच्या विकासात आणि वैभवात भर पडली आहे, त्याचे महत्त्व दर्शवणारे चित्र काढून पाठवावे. उदा. महाराष्ट्रातील स्मारके, गडकिल्ले, ऐतिहासिक प्रसंग, व्यक्ती (पोर्ट्रेट), प्रेक्षणीय ठिकाणे, रस्ते, धरणे, पूल, इत्यादी. वॉटर कलर, ऑइल कलर्स, अॅक्रिलिक अशा विविध स्वरूपातील असावे. तसेच मधुबनी, मंडल आर्ट, पिछवाई, वारली इत्यादी शैली वापरल्यास चालेल. चित्र A3 आकारात ड्रॉइंग पेपरवर 12×17 इंच या आकारात पाठवावे.
वेशभूषा स्पर्धेकरिता ज्यांनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले, अशा नव्या-जुन्या स्त्रीशक्तीची वेशभूषा सादर करणारा १ मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवावा. ज्या व्यक्तिरेखेची वेशभूषा सादर केली जाणार आहे तिच्याविषयी माहिती देणारा हा व्हिडीओ असावा.
या तीन विभागापैकी कोणत्याही एका विभागात भाग घेता येईल. विजेत्यांना सोन्याची नथ, सोन्याचे नाणे, चांदीचे नाणे, पैठणी, डिझायनर साडी यासह आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
ही स्पर्धा प्रामुख्याने ऑनलाइन होणार असल्याने परीक्षक फेरी, फेसबुक लाइक याद्वारे अंतिम विजेता निवडण्यात येईल. इच्छुकांनी आपली कलाकृती ३ मेपर्यंत पाठवावी. लेखन / चित्र कलाकृती / वेशभूषा व्हिडिओ व्हॉटसअॅप क्रमांक 9324173409 किंवा मेल आयडी – radnyeewwa@gmail.com किंवा https://forms.gle/4Gg1BHMKM6hvxc85A या लिंकवर पाठवावी.
अंतिम निकाल ११ मे रोजी जाहीर करण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून १८ वर्षांवरील महिला यात सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत ठाणे जिल्हा (नवी मुंबईसह), मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर या कार्यक्षेत्रातील महिला भाग घेऊ शकतात. अधिक महितीसाठी ९९६७६३७२५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशनच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी वैशाली गायकवाड यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

