देवरूख : येथील मातृमंदिर संस्थेने २ ते ६ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत युवा संवाद शिबिर आयोजित केले आहे.
मातृमंदिर संस्थेला श्रमसंस्कार शिबिरांचा ५२ वर्षांचा समृद्ध वारसा आहे. कोकणच्या मदर तेरेसा हळबे मावशींनी कोकणातल्या देवरूखसारख्या दुर्गम पण नितांत सुंदर गावामध्ये ६५ वर्षांपूर्वी सामाजिक कामाची सुरुवात केली. या संस्थेत आरोग्य विभाग, कृषी, औद्योगिक, बालशिक्षण, बालविकास, बचतगट, पाणी प्रश्न, ग्रामीण विकास असे प्रकल्प सुरू आहेत. रुग्णसेवा करत असतानाच सामाजिक स्वास्थ्यही उत्तम व्हावे, म्हणून १९६९ साली युवकांची श्रम संस्कार शिबिरे सुरू करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून घडलेली पिढी महाराष्ट्रात ठिकठिकाणी समाजासाठी कार्यरत आहे.
हाच वारसा पुढे नेत मातृमंदिरने यावर्षी दिवाळी सुट्टीत युवा संवाद शिबिराचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभरातल्या तरुणाईला स्वतःशी आणि भवतालाशी संवाद साधण्याचा व्यासपीठ उपलब्ध होत आहे. हा संवाद महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांशी, कृतिशील युवा कार्यकर्त्यांशी, समाजातील दुर्लक्षित घटकाशी, दुर्गम भागातील जगण्याच्या संघर्षाशी, निसर्गसंपन्न पण मागास भागाशी, मानवतावादी चळवळीशी परस्परांशी आणि सर्वांत महत्त्वाचा संवाद स्वतःशी असेल.
हे शिबिर २ ते ६ 6 नोव्हेंबर या कालावधीत १७ ते २३ वयोगटासाठी असून त्याचे शुल्क ५०० रुपये आहे. हे शिबिर ओझरे (देवरूख) येथील मातृमंदिर फार्ममध्ये प्रा. मधू दंडवते कृषि विद्यालयात होईल. नोंदणीसाठी सतीश (९३७०६६८४८३), अश्विनी (७०८३११००२७), सुमित (७०२०८६०९४२) किंवा किरण (८४०१४९१७०९) यांच्याशी संपर्क साधावा.
नोंदणी ऑनलाइनही करता येणार असून त्याचा गुगल फॉर्म पुढे दिला आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScy28ZJofqdi-yrgTiY9sDNSuCJ2iVotID0EMa5F3XZYAnxFw/viewform


