Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

खारवी समाज पतसंस्थेच्या शृंगारतळी शाखेचे उद्घाटन

Advertisements

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या शृंगारतळी (ता. गुहागर) येथील शाखेचे मोठ्या थाटात रविवारी उद्घाटन झाले.

शृंगारतळी येथील सोन्या-चांदीचे प्रतिष्ठित व्यापारी जय गुहागरकर यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता शरद गुहागरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

खारवी पतसंस्थेने चार वर्षांत एक कोटी २० लाख स्वनिधी आणि सुमारे आठ लाखाचे भागभांडवल उभे करून सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला. रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांतून प्रचार आणि प्रसार करत सभासद संख्या वाढवून जनमानसामध्ये विश्वास निर्माण केला. सलग चार वर्षे पतसंस्थेने लेखापरीक्षणाचा अ वर्ग आणि शून्य टक्के एनपीए राखत पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. पहिल्या वर्षांपासून सभासदांना संस्थेने लाभांश दिला. थकबाकीचे प्रमाण सलग ४ वर्षे अत्यल्प ठेवण्यात आणि विक्रमी वसुलीची परंपराही कायम ठेवण्यात पतसंस्थेला यश आले. सोनेतारण कर्जव्यवहात १०० टक्के वसुली, कर्ज आणि ठेवी यांच्या आदर्श प्रमाणात राहून ठेवींवर जास्तीत जास्त व्याज, सीआर, एआरचे कमीत कमी आवश्यक असलेले ९ टक्क्यांचे प्रमाण १९.५४ टक्क्यांपर्यंत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा कोकण विभागातील राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार असे पतसंस्थेचे यश आहे. पतसंस्थेचा पारदर्शक व्यवहार पाहता सहकार खात्याकडून संस्थेला शृंगारतळी, दाभोळ, खंडाळा, पालशेत, पूर्णगड अशा पाच शाखा सुरू करायला मंजुरी मिळाली आहे.

शृंगारतळी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सौ. वृषाली गुहागरकर, जयशेठ गुहागरकर पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे, संचालक मंडळ सदस्य, समन्वय समिती सदस्य, कर्मचारी, समाजातील अनेक मान्यवर आणि समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने श्री सत्यनारायण पूजा पार पडली. पतसंस्थेची दुसरी शाखा दाभोळ येथे लवकरच सुरू करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केला.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version