देवरूखच्या मातृमंदिर संस्थेतर्फे मुलांसठी ऋतुसंवाद शिबिर

देवरूख : येथील मातृमंदिर संस्थेने ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी चार दिवसांचे निवासी ऋतुसंवाद शिबिर आयोजित केले आहे. बालमित्रांसाठी हे उन्हाळी सुट्टीतील धम्माल शिबिर असेल.

संस्कार शिबिरांचा ५२ वर्षांचा वारसा असलेल्या मातृमंदिर संस्थेने ऋतूंप्रमाणे बदलणारा भवताल अनुभवण्यासाठी ऋतुसंवाद शिबिराचे आयोजन केले आहे. वर्षभरातील तीन ऋतूंमध्ये तीन शिबिरे अशी संकल्पना असलेल्या या मालिकेत आत्तापर्यंत तीन शिबिरे झाली असून या उन्हाळी सुट्टीतील शिबिर १७ ते २० एप्रिल या कालावधीत होणार आहे. या चार दिवसीय निवासी शिबिरामध्ये उन्हाळ्यातील निसर्गघटकांचे निरीक्षण विशेष उपक्रमांच्या आधारे होईल. त्यातील प्रमुख उपक्रम असे – देवराई नेचर ट्रेल, बांबू क्राफ्ट, वैज्ञानिक खेळणी, वारली पेंटिंग, नैसर्गिक रंग बनवणे, ओरिगामी, आकाशदर्शन, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी, मातीकाम, धम्माल गाणी आणि अनोखे खेळ. याशिवाय मातृमंदिरच्या २४ एकरच्या शेतात असलेली विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, भाजी लागवड, मसाला पिके, गुरांचा गोठा, गांडूळखत प्रकल्प, मधुमक्षिका पालन, सेंद्रिय खत प्रकल्प, मश्रूम प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, रोपवाटिका इत्यादी प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट घडवून आणली जाणार आहे.

देवरूखच्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाशी संवाद साधायला ओझरे (देवरूख) येथे होणार असलेल्या या शिबिरात आपल्या ९ ते १४ वयोगटातील मुलांना जरूर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराचे शुल्क प्रत्येकी एक हजार ५०० रुपये असून अन्य माहिती तसेच नोंदणीसाठी सतीश (9370668483) किंवा अश्विनी (7083110027) यांच्याशी संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply