विरार : आरोग्याची माहिती दिली तर सर्वांत कमी पैशात सर्वाधिक आरोग्य सुधारते, या कल्पनेने आजच्या १२ मेच्या परिचारिका दिनापासून सलग पाच महिने आरोग्यविषयक झूम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पालघर जिल्हा पत्रकार संघ, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स महाराष्ट्र शाखा, आय. एम. ए. या संस्थेचे सदस्य विरार येथील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, आरोग्य ज्ञान यज्ञ आहे. त्यातून सर्वांपर्यंत आरोग्याची माहिती पोहोचवावी, या उद्देशाने हा उपक्रम परिचारिका दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येत आहे. इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सची महाराष्ट्र शाखा आणि आय.एम. ए. महाराष्ट्र या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडणार आहे. आजपासून सलग पाच महिने हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. रविवार वगळता दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत हा कार्यक्रम होईल. परिचारिका, पालक, डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद यूट्यूबवर MAHAIAP वर,

२) https://us02web.zoom.us/j/83524365840?pwd=VDJNY1BMMFBxaytxTXppblZZUDU4dz09 या झूम लिंकवर घेता येईल. (त्याचा मीटिंग आयडी 835 2436 5840 असून 123456 हा पासवर्ड आहे. यू ट्यूबची लिंक अशी – https://tinyurl.com/mahaiaplive
डॉक्टरांना विनंती इंग्रजीत शिकून मराठीत सांगणे कठीण असते. म्हणून मराठीत आरोग्यविषयक कार्यक्रम ऐका आणि सोप्या मराठीत आरोग्याबद्दल बोला, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले आहे.
सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करूनही हा कार्यक्रम पाहता येईल.

