रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सहयोगाने प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याचा उद्योग रत्नागिरीत सुरू करण्याचे सूतोवाच अमेरिकेतील नामांकित औषध कंपनीचे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी केले.
डॉ. निमकर रत्नागिरीत आले असता त्यांनी रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या दक्षिण रत्नागिरी रुग्णोपयोगी साहित्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांनी जनकल्याण समितीचे काम कसे चालते, याबाबत माहिती करून घेतली. विशेष म्हणजे भेटीला येताना डॉ. निमकर व्हीलचेअर घेऊन आले.
डॉ. निमकर यांचे सामाजिक कार्य मोठे असून ते अनेक वर्षांपासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत. जनकल्याण समितीच्या भेटीप्रसंगी काही उपक्रम सुरू करण्यावर त्यांनी चर्चा केली. प्लास्टिक संकलन करून त्यावर प्रक्रिया करून उपउत्पादने निर्माण करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. निमकर स्वतः त्याबाबत काम करत असून रत्नागिरीतसुद्धा काही करता येईल का, याबाबत विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य पर्यावरणविषयक उपक्रम करण्याची खूप मोठी संधी आहे, असे त्यांनी सांगून लवकरच नवीन उपक्रम सुरू करण्याबाबत आश्वासन दिले.
याप्रसंगी कार्यवाह मंदार जोशी, उपाध्यक्ष श्री. दळवी, महेश नवेले, श्री. कांबळे, जाणीव फाउंडेशनचे प्रमुख महेश गर्दे आणि अवधूत मुळ्ये उपस्थित होते.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

