रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांसाठी रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील विविध परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्पृहणीय यश मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना संघातर्फे गुणवत्ता पारितोषिके दिली जातात. यावर्षीदेखील ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त आणि बारावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी संघाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत.
कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील आठवीपासून पुढील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी कर्हाडे ब्राह्मण संघात उपलब्ध असणाऱ्या विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे.
पारितोषिके आणि आर्थिक मदतीसाठी रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघ, शेरे नाका, झाडगाव, रत्नागिरी (दूरध्वनी ०२३५२-२२४५७९) येथे संपर्क साधून १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज द्यावेत, असे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड