दापोलीत १४ जानेवारीला तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन

दापोली : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन येत्या १४ जानेवारी रोजी दापोली येथे होत आहे. त्यात्पूर्वी १० ते १३ जानेवारीला सायकल चित्रपट महोत्सव होणार आहे.

सायकल संस्कृती जपली जावी यासाठी दरवर्षी सायकलप्रेमी एकत्र येऊन रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन आयोजित करतात. आतापर्यंत खेड आणि रत्नागिरी येथे सायकल संमेलन झाले असून तिसरे सायकल संमेलन दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज हॉलमध्ये १४ जानेवारी रोजी होत आहे.

दापोली सायकलिंग क्लब आयोजित या सायकल संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील, राज्य आणि देश-विदेशातील अनेक सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत. पाच दिवस सायकलविषयक भरगच्च माहितीपूर्ण कार्यक्रम असणाऱ्या या संमेलनाची प्राथमिक रूपरेषा अशी असेल – १० ते १३ जानेवारी रोज सायंकाळी ५ ते ८ सायकल चित्रपट महोत्सव असेल. यामध्ये सायकलविषयक चित्रपट, व्हिडीओ, डॉक्युमेंटरी दाखवण्यात येतील, ३०-४० वर्षांपूर्वी सायकल मोहिमा केलेल्या काही सायकलप्रेमींचे अनुभवकथन असेल. १३ जानेवारी रोजी सायकलची ओळख, खरेदी, दुरुस्ती, लांब पल्ल्याचे सायकलिंग, तयारी याबद्दल मार्गदर्शन सेशन, डेमो होतील.

१४ जानेवारी हा संमेलनाचा मुख्य दिवस असून यादिवशी सकाळी साडेसात वाजता दापोली परिसरात सायकल दिंडी असेल. ९ वाजता सायकल संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले महाराष्ट्रीय आणि दापोलीकर सुरेंद्र चव्हाण आणि मान्यवर यांच्या हस्ते होईल. पूर्ण दिवस अनेक सादरीकरणे, चर्चासत्रे, अनुभव कथन इत्यादी असेल. यामध्ये कॅन्सरवर मात करत आयर्नमॅन बनलेले डॉ. तेजानंद गणपत्ये, हाफ आयर्नमॅन मिलिंद खानविलकर, डेक्कन क्लीफहँगर फिनिशर रूपेश तेली, सायकलने नर्मदा नदी परिक्रमा केलेले संजय सावंत, आजारावर मात करत एसआर बनलेले मृत्युंजय खातू, रॉकेटमॅन अहमदअली शेख, एका वर्षांत ३ एसआर केलेले अमित कवितके, १००० किमी बीआरएम पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली महिला डॉ. मनीषा वाघमारे, ७५ तासात १००० किमी करणारे प्रशांत दाभोळकर, रोहन पवार, सह्याद्री रँडॉर्निअरचे अनंत भाटवडेकर, श्रीनिवास गोखले, नीलेश कुष्टे, डॉ. रामदास महाजन, जगातील सर्वांत उंच घाटरस्ता उमलिंगला पास सायकलने सर करणारे यश म्हसकर, संपूर्ण महाराष्ट्र सायकलने भटकंती करत ३६५ दिवसांत ३७० किल्ले सर करणारा मावळा सुबोध गांगुर्डे, ८५ दिवसांत ६००० किमी सायकल प्रवास करत १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा करणारी पूजा बुधवले, कोटेश्वर ते किबीतू, सियाचीन ते कन्याकुमारी, नेपाळ, श्रीलंका सायकल मोहीम केलेले डॉ. रामेश्वर भगत, हवामान बदलाच्या जागृतीसाठी रस्त्याने जगपरिक्रमा केलेले पहिले भारतीय हिंदयानचे विंष्णुदास चापके, जीआरएम सुरू करणारे गोपाल साबे पाटील, अंधत्वावर मात करत सायकलिंग करणारे सागर बोडके, मुंबई परिसरातील धनंजय मदन, सुधीर चकोले, प्रज्ञा म्हात्रे, राम जोशी, कुणाल सुतार इत्यादी अनेक नावाजलेले सायकलस्वार सहभागी होणार आहेत.

१४ जानेवारीसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये, तर विद्यार्थ्यांसाठी १५० रुपये असून यामध्ये चहा-अल्पोपाहार, जेवण समाविष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्याबाहेरून सायकल चालवत येणाऱ्या सायकलिस्टसाठी प्रवेश विनामूल्य असेल. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर अंबरीश गुरव ८६५५८७४४८६, प्रशांत पालवणकर ८७६७२८५८२७, सुरज शेठ ८३०८३६६३६६, विनायक वैद्य ९९६००९६४३५ हे आहेत.

हे सायकल संमेलन पुन्हा सायकलिंग सुरू करण्यासाठी आणि आरोग्यदायी तंदुरुस्त तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

संमेलनासाठी नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी लिंक अशी :

https://forms.gle/K7g1Ec6A4fSL28i29

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply