श्रीराम मंदिरात शनिवारी सातवा भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा

रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने येत्या शनिवारी (दि. १३ जानेवारी) सातवा भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा होणार आहे.

भजनकला अभ्यासक बुवा प्रकाश वराडकर भजनातील पारंपारिक गवळण गीतांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत सातवा भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा होणार आहे. श्री. वराडकर भजनांमधील पारंपरिक गवळण या विषयावर शास्त्रोक्त मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी पारंपरिक गवळण गीते सादर करणाऱ्या भजनी कलावंतांनाही गीते सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. या भजनी कलावंत मेळाव्याचे अध्यक्षस्थान या कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये भूषविणार असून सचिव श्रीसुरेंद्र घुडे या भजनी मेळाव्याचे सूत्रसंचालन करतील.

श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा हा सातवा भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा असून मागील तीन मेळाव्यात भजनी बुवा श्री. वराडकर यांनी पारंपरिक भजनी गीतांची मांडणी तसेच भजनासाठी लागणारी पारंपरिक वाद्यांचा परिचय करून दिला होता. गेल्या महिन्यातील मेळाव्यात भजनांमधील भारूड गीतांविषयी अभ्यास पूर्ण माहिती दिली होती. आता या मेळाव्यात भजनांमधील पारंपरिक गवळण गीते आणि ती ओघवत्या शैलीत सादर करण्याची कला याविषयी ते शास्त्रोक्त मार्गदर्शन करणार आहेत. भजनी मेळाव्यांच्या या उपक्रमाला कलावंतांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आता सातव्या मेळाव्यातही भजनी कलावंतांनी नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कट्ट्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर कासेकर यांनी केले आहे.


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply