विनायक राऊत यांच्यासह दोघांचे चार उमेदवारी अर्ज

लोकसभा निवडणूक २०२४ वृत्त

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आज तिसऱ्या दिवशी खासदार विनाक राऊत यांच्याह एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ही माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. येत्या १९ एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून २० एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार आहे. त्याकरिता अर्ज भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. काल दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आज तिसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विद्यमान खासदार विनायक भाऊराव राऊत यांनी एकूण ३ अर्ज दाखल केले. अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष म्हणून १ अर्ज सादर केला. अशा एकूण दोन उमेदवारांनी आज ४ अर्ज दाखल केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply