Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

Advertisements

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेतर्फे २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव व्हावी, ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रसाराबरोबरच शोषणमुक्त समाज निर्मिती व्हावी, यासाठी २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा बँक ऑफ महाराष्ट्रची वैभववाडी शाखा आणि वैभववाडी पोलीस ठाण्याने पुरस्कृत केली आहे. स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन गट, महाविद्यालय गट व खुला गट अशा तीन गटांत होणार आहे.

स्पर्धेचा तपशील असा –
१) पहिला गट- कनिष्ठ महाविद्यालयीन गट (इयत्ता अकरावी-बारावी), विषय- ग्राहक म्हणून माझी अपेक्षा. शब्दमर्यादा २०० ते २५०.

२) दुसरा गट- महाविद्यालय गट – विषय- मॉल संस्कृती आणि ग्राहक, शब्दमर्यादा- ३०० ते ३५०.

३) तिसरा गट- खुला गट – विषय- चळवळीचे सामर्थ्य आणि ग्राहक, शब्दमर्यादा- ४०० ते ४५०.

स्पर्धकांनी निबंध स्वच्छ अक्षरात फुल स्केप पानाच्या एका बाजूला लिहून पाठवावेत. स्पर्धकाने संपूर्ण नाव, पत्ता, वर्ग, कनिष्ठ किंवा महाविद्यालयाचा पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्र पानावर लिहावा. निबंध १५ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या पत्त्यावर पाठवावेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५०१, ३०१ आणि २०१ रुपयांची बक्षिसे, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय ग्राहक दिनी गौरविण्यात येईल. जिल्ह्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध पाठविण्यासाठी पत्ता – अध्यक्ष, सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा, घर नं. ५४४, ‘श्रीनीश’ मु. पो. ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ४१६ ८१०.

अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील (9834984411), संघटक सीताराम ऊर्फ दादा कुडतरकर (9422239090) किंवा सचिव संदेश तुळसणकर (9420100946) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version