ग्राहक पंचायतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

वैभववाडी : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून कोकण विभाग ग्राहक पंचायतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग होण्यासाठी, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव व्हावी, तसेचं ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धा उच्च माध्यमिक गट, महाविद्यालयीन गट आणि खुला अशा तीन गटांत होणार आहे. स्पर्धेचा सविस्तर तपशील असा गट पहिला- अकरावी- बारावी – विषय – बाजारपेठेची बदलती रूपे आणि ग्राहक, शब्दमर्यादा ३०० ते ४००. गट दुसरा – महाविद्यालय गट, विषय – २०१९ चा ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहक, शब्दमर्यादा ४०० ते ५००य गट तिसरा- खुला गट – विषय करोना काळातील ग्राहकता, शब्दमर्यादा – ५०० ते ६००.

स्पर्धकांचा निबंधं स्वच्छ अक्षरात पानाच्या एका बाजूला लिहिलेला असावा. स्पर्धकाचे संपूर्ण नाव, वर्ग, शाळा, महाविद्यालयाचा पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक स्वतंत्र पानावर लिहावा. निबंध १५ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या पत्त्यावर पाठवावेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्क म व प्रमाणपत्र तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. निबंध प्रा. एस. एन. पाटील (ग्राहक पंचायत महाराष्ट्र – कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष), मु. पो. ता. वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत.

ही निबंध स्पर्धा राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वैभववाडी शाखेने पुरस्कृत केली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply