सॅटर्डे क्लबशी जोडले जाण्याची विविध व्यावसायिकांना संधी

रत्नागिरी : सॅटर्डे क्लबशी जोडले जाण्याची आणि त्यातून आपला व्यवसाय वाढविण्याची संधी विविध व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑटो गॅरेज, बिल्डर, कोचिंग क्लासेस, इलेक्ट्रिशियन, ज्वेलर, इन्टिरिअर डेकोरेटर, मसाले उद्योजक, जिम, फिटनेस ट्रेनर, कापड आणि कपडे विक्रेते अशा किती तरी व्यावसायिकांना नवे ग्राहक जोडण्यासाठी ही संधी असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आले आहे.

करोनामुळे सध्या सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट आहे. अनेकांना व्यवसायात तोटा झाला, तर अनेक व्यावसायिकांना अजूनही सूर सापडलेला नाही. अशा स्थितीत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक व्यावसायिकांना रत्नागिरीच्या सॅटर्डे क्लबने वेगवेगळ्या व्यावसायिकांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ऑनलाइन बैठकीचे निमंत्रण दिले आहे. एकमेकां साह्य करू अवघे होऊ श्रीमंत असे ब्रीदवाक्य असलेल्या या क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन मोफत बैठक होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योजकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या उद्योगाच्या भरभराटीची संधी मिळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑटो गॅरेज, फर्निचर मॅन्युफॅक्चरर, कार्पेंटर, ब्यूटी पार्लर, बिल्डर, कोचिंग क्लासेस, इलेक्ट्रिशियन, इव्हेंट मॅनेजमेंट, ज्वेलर, प्रिंटिंग प्रेस, ऑप्टिशियन, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, ट्रॅव्हल एजंट, परदेश प्रवास सल्लागार, सुपर मार्केट, होलसेलर, इन्टिरिअर डेकोरेटर, मसाले उद्योजक, घरपोच मत्स्यविक्रेते, जिम, फिटनेस ट्रेनर, कापड, तयार कपडे विक्रेते, इलेक्ट्रॉनिक दुकानदार, सेवा पुरवठादार, टेलर, कृषी सेवा केंद्रचालक, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, वकील, डॉक्टर, डेन्टिस्ट, ज्योतिषी, वास्तू सल्लागार, चॉकलेट मेकर, लॉजिस्टिक्स, कुरिअर, भाड्याने कार देणारे, डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करणारे, चार्टर्ड अकाउंटंट अशा अनेक व्यावसायिकांना झूम ॲपवरून होणाऱ्या या बैठकीत सहभागी होता येऊ शकेल. आपल्या व्यवसायाचा उत्कर्ष साधून श्रीमंत व्हावे, असे वाटणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्या मोठ्या मराठी उद्योजकांनी या मोफत बैठकीत सहभागी व्हावे. त्यातूनच सॅटर्डे क्लबचे सदस्यत्व स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल, अशी खात्री बैठकीच्या आयोजकांना आहे.

अधिक माहिती आणि नावनोंदणीकरिता विनोद वायंगणकर (७८४१८७२४३१), सचिव चंद्रकांत राऊत (९९२०४७५१७४) किंवा खजिनदार सौ. मानसी महागावकर (९८९०९९१४०७) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
…..
सॅटर्डे क्लबविषयी अधिक माहितीसाठी सोबतचे व्हिडिओ अवश्य पाहावेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply