रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र क्र. 7352-A यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रमाणपत्र प्रशिक्षणक्रम (Program Code – C-177) हा अभ्यासक्रम 1 वर्ष कालावधीचा (अर्ध वेळ) असून, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाद्वारे महिलांना आणि विद्यार्थिनींना आरोग्यसेवेशी संबंधित रोजगारासाठी सक्षम बनवण्याचा उद्देश या कोर्समागे आहे.
या अभ्यासक्रमाला दहावी पास / नापास / रेग्युलर पदवीसह डिस्टन्स लर्निंगमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी तसेच रुग्णालयात काम करत असलेल्या किंवा काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असलेल्या, सातवी पास असलेल्या महिलांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.
महिलांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण, अनुभवी प्रशिक्षण स्टाफ, रुग्णसेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित व्यावहारिक प्रशिक्षण, स्वयंरोजगाराची व विविध रुग्णालयांत रोजगार संधी आदी या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.
सध्या लहानमोठ्या शहरांमध्ये तसेच गावागावांतून रुग्णांची काळजी घेण्यास प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. या कोर्समुळे महिलांना आणि विद्यार्थिनींना नर्सिंग होम्स, हॉस्पिटल अटेंडंट, घरगुती केअरटेकर वृद्धाश्रम अशा क्षेत्रांत काम करण्याची संधी उपलब्ध होते. आरोग्यसेवा क्षेत्रात सतत वाढणाऱ्या गरजा लक्षात घेता, हा कोर्स भविष्यातील करिअरसाठी एक मजबूत पायरी ठरू शकतो.
अभ्यासक्रमाचे स्वरूप अर्धवेळ स्वरूपाचे असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पदवी शिक्षण घेताना सोबत हा कोर्स करता येऊ शकतो. तसेच गृहिणी, व नोकरी करणाऱ्या इच्छुक महिलांनासुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करून रुग्ण सहाय्यक म्हणून काम करू शकतात.
हा अभ्यासक्रम ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने तसेच प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांना त्वरित प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश नोंदणी असल्याने अधिक माहितीसाठी संपर्क : 7666504243 / 7499821369. संस्थेचा पत्ता : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी. स्वतःहून नोंदणी करणार असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन सेंटर कोड व अभ्यासक्रम कोड टाकून प्रवेश घेता येईल. ऑनलाइन प्रवेशासाठी संकेतस्थळ: www.ycmou.ac.in |http://ycmou.digitaluniversity.ac

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

