नियम मोडणाऱ्यांवर रत्नागिरी पोलिसांच्या इंटरसेप्टर वाहनाचं लक्ष

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस मुख्यालयात या वाहनाचं लोकार्पण करण्यात आलं. वेगमर्यादा ओलांडणं, सीट बेल्ट न लावणं, चुकीच्या दिशेने वाहन चालवणं अशा विविध प्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित आणि पारदर्शक पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे. महामार्गावरच्या प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे वाहन महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करूनच वाहनं चालवावीत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

This slideshow requires JavaScript.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply