Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्रासाठी साहित्य भेट

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्रासाठी साहित्य भेट देण्यात आली.

इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर ऑफ इंडिया (पुणे) यांनी घरडा केमिकल्स लिमिटेडमार्फत “साथ निरामय आरोग्यासाठी २०२५-२६” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी या वस्तू दिल्या. एक स्मार्ट टेलिव्हिजन, दोन कॅरम बोर्ड आणि तीन चेस बोर्ड भेट देण्यात आले. या कार्यक्रमात आय. एल. सी. आय.च्या रिसर्च कोऑर्डिनेटर सौ. यशोदा पाध्ये यांनी ज्येष्ठांचे मार्मिक आरोग्य याविषयी सप्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. आय. एल. सी.आय.चे प्रोग्राम ऑर्गनायझर सुशांत सोनवणे यांनी तंत्रसहाय्यक नंदकुमार सकट यांच्या साथीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.

संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी कार्याध्यक्ष विजय निंबाळकर व उपाध्यक्ष श्रीमती पद्मजा बापट यांच्या समवेत भेटवस्तूंचा स्वीकार केला आणि भेटीबद्दल आभार व्यक्त केले.

या विरंगुळा केंद्राचा लाभ सभासदांनी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version