जिल्हा युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय लोकनृत्य व पथनाट्य प्रथम

जिल्हा युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय लोकनृत्य व पथनाट्य प्रथम

रत्नागिरी : येथे पार पडलेल्या जिल्हा युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने लोकनृत्य व पथनाट्य प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्हाभरातील विविध महाविद्यालयांमधील युवक-युवतींनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धांमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला.

महोत्सवात महाविद्यालयाने लोकनृत्य व पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर आणि लोकगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच काव्यलेखन स्पर्धेत वेदश्री जाधव हिने द्वितीय, तर कुंदन सागवेकर याने तृतीय क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रा. कश्मिरा सावंत, प्रा. साई जिरोळे, प्रा. आर्या वंडकर व सर्व मार्गदर्शक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महोत्सवाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव आणि 'माय भारत' पोर्टलचे जिल्हा समन्वयक सम्राट पाटील उपस्थित होते.

कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई,कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply