गुहागर : येथील धावपटू अनंत तानकर यांनी कल्याण येथे पार पडलेल्या धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी केली आहे.
रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी ३३ ते ५५ या वयोगटात ही चुरशीची स्पर्धा पार पडली. कल्याण येथे रोटरी क्लबने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ३३ ते ५५ वयोगटातील अनेक दिग्गज धावपटूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अनंत तानकर यांनी सुरुवातीपासूनच आपला धावण्याचा वेग कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. श्री. तानकर यांनी आपला अनुभव आणि जिद्दीच्या जोरावर ही शर्यत द्वितीय क्रमांकाने पूर्ण करत यशाचा झेंडा रोवला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर गुहागरचे सुपुत्र आणि रत्नागिरीची शान असलेले श्री. यांनी हे यश मिळविले आहे.
अनंत तानकर यांच्या या यशामुळे गुहागरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. गुहागरचा अभिमान असलेल्या या धावपटूने कष्ट आणि सातत्याच्या बळावर हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल त्यांना दिल्या जात आहेत.
Follow Kokan Media on Social Media

