देवरूखच्या सोळजाई मंदिरात लक्षवेधी रांगोळ्या

देवरूख : देवरूखची ग्रामदेवता श्री सोळजाई मंदिरामध्ये देवरूखच्या खालच्या आळीतील हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या युवकांनी दिवाळीनिमित्ताने लक्षवेधी रांगोळ्या साकारल्या आहेत. त्या रांगोळ्या भक्तांच्या आणि कलारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

वालावलपुरी उभा मुरारी, वैकुंठीचा राया…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातलं म्हणजे वालावल हे निसर्गसंपन्न गाव ओळखलं जातं ते तिथल्या श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामुळे. या मंदिराबद्दलच्या काही दंतकथा, कथा, आख्यायिका, प्रथा-परंपरा याबद्दल आशीष पणशीकर यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

गोळपच्या हरिहरेश्वर मंदिरातला वैशिष्ट्यपूर्ण कार्तिकोत्सव

रत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. टिपर्‍या, पट्टे अशा खेळांसह या मंदिरात होणारा कार्तिकोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या उत्सवाविषयी अविनाश काळे यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

देवरूख निगुडवाडीतील ‘आराधने’ची आगळीवेगळी परंपरा

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरूखजवळच्या निगुडवाडीत पूर्वीच्या काळी गावकरी एकत्र येऊन गावात कोणतीही रोगराई येऊ नये यासाठी ग्रामदेवतांकडे आराधना करीत, प्रार्थना करीत, विनंती करीत. ती आराधना पद्धत आजही सुरू असून, या आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल शांताराम गोरुले यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

केळशीचा रथोत्सव आणि पलित्यांचा नाच

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या केळशी गावात हनुमान जयंतीला होणारा श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव आणि गणेशोत्सवात माहेरवाशीण गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोल-सनईच्या तालावर श्रीकालभैरवाच्या साक्षीने रंगणारा सामूहिक पलित्यांचा नाच हे दोन्ही प्रकार आगळेवेगळे आहेत. चिपळूणमधील लेखक, पत्रकार धीरज वाटेकर यांनी त्याबद्दल लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

दुद्दुम्ऽनाम्ऽनाम्… एक स्मरणरंजन !

रत्नागिरीतील श्रीनिवास सरपोतदार यांनी सुमारे ६० वर्षांपूर्वी आपल्या लहानपणी गावी उत्सवात पाहिलेल्या-अनुभवलेल्या नमन-खेळ्यांच्या स्मरणरंजनावर आधारित लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.