खेड : नक्षलवाद्यांशी लढताना जखमी झालेला आपला पाय स्वतःच कापून टाकून नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे शिवतर (ता. खेड) येथील कमांडर हवालदार मधुसूदन ना. सुर्वे यांच्या शौर्यावर आधारित चित्रपट आकार घेत आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
खेड : नक्षलवाद्यांशी लढताना जखमी झालेला आपला पाय स्वतःच कापून टाकून नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे शिवतर (ता. खेड) येथील कमांडर हवालदार मधुसूदन ना. सुर्वे यांच्या शौर्यावर आधारित चित्रपट आकार घेत आहे.
दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या १४२ व्या जयंतीचे औचित्य साधून जालगाव (ता. दापोली) येथे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीच्या स्मारकाचा काल (दि. ७ मे) प्रारंभ झाला. जालगाव अपना स्वीट्सच्या इमारतीत मुख्य कार्यक्रम झाला.
रत्नागिरी : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. मात्र बैठकीत सुचविण्यात आलेले उपाय आणि करण्यात आलेली निधीची तरतूद पुरेशी नाही, असे मत चिपळूण बचाव समितीतर्फे व्यक्त करण्यात आले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त, व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक आणि वाहनधारकांना अल्प दरात कर्जपुरवठा करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळणार की, पाच टक्के दराने, याचा खुलासा होऊ शकला नाही.
चिपळूण : चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा वेढा दरवर्षीच पडत असल्याने चिपळूणला महापूर नवीन नाही. मात्र यावर्षीच्या २२ जुलैच्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकाराची नवी भीषण उंची गाठली.
रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेडमधील पूरग्रस्तांसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. प्रामुख्याने चिपळूण शहराच्या विविध भागांमध्ये पाच हजाराहून अधिक लोक अडकून पडले आहेत.