कवितेची राजधानी अशी ओळख असलेलं मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (२० एप्रिल २०२५) मोठ्या उत्साहात पार पडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कवितेची राजधानी अशी ओळख असलेलं मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (२० एप्रिल २०२५) मोठ्या उत्साहात पार पडला.
विविध बोलीभाषा हेही मराठीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. या भाषा संवर्धित झाल्या, तरच प्रमाण मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेवायला मदत होणार आहे. या दृष्टीने बोलीभाषांचे संवर्धनही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या बोलीभाषामधील कार्यकर्ते दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना आणखी बळ प्राप्त झाले आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या साहित्यभूमीमध्ये झालेल्या मालवणी साहित्य संमेलनाकडे पाहायला हवे.
बोलीभाषांच्या अस्तित्वाबद्दल चिंतेचे सूर ऐकू येत असताना एखाद्या बोलीभाषेतील लोकनाट्याचे तब्बल ५०० प्रयोग होणे हा एक विक्रमच आहे. हे भाग्य कोकणातील संगमेश्वरी बोलीला लाभलं असून, ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे त्या विक्रमी लोकनाट्याचं नाव आहे. अस्सल स्थानिक कलाकृती संस्कृतिवाहक कशी ठरू शकते आणि बोलीभाषेच्या पुनरुज्जीवनालाही कसा हातभार लावू शकते, हे या लोकनाट्याच्या उदाहरणावरून दिसतं. २३ मार्च २०२५ रोजी अडूर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) इथे या लोकनाट्याचा ५००वा प्रयोग होत आहे. त्या निमित्ताने…
मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला उत्कृष्ट साहित्यिक अंक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि चिपळूण नगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्फूर्तिगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजते. याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा निखळत जातो. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे. शब्दांचा वारसा आपल्याला घरातून मिळतो, पण आज अंगाई गाणाऱ्या आयाच आपल्याकडे नाहीत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.