नेरूरकर साहेब आता भेटणार नाहीत…….

कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्वर्यु अरुण नेरूरकर यांचे ७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.

नारायण पाटणकर यांच्या अमृतानुभव पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी : नारायण पाटणकर यांनी २७ वर्षांत सुमारे चार हजार पानांचे आध्यात्मिक लिखाण केले. ते स्वतः लेखक, प्रतिभावंत कवी, द्रष्टे अभ्यासक आहेत. अद्वैत तत्त्वज्ञान, जीव, ब्रह्म, भारतीय तत्त्वज्ञान, जे. कृष्णमूर्ती यांचे विचार व आधुनिक विज्ञानाचा सखोल अभ्यास आहे. त्यांच्या ग्रंथातून जीवनाचे सार मिळते, असे प्रतिपादन संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. चंद्रशेखर भगत यांनी केले.

कोकण मीडियाचा दिवाळी अंक येतोय! ‘कोकणातील खाद्यसंस्कृती’ विषयावरील लेख स्पर्धेचा निकाल जाहीर

कोकणातील वैविध्यपूर्ण विषयांचं दस्तावेजीकरण करण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदा (२०२५) दहावा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध होत आहे. या अंकासाठी कोकणातील खाद्यसंस्कृती हा विषय घेण्यात आला असून, त्या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहोत.

‘शब्दांच्या पलीकडले’ अभिजाततेचा मागोवा घेणार – रामचंद्र आंगणे

आचरे (ता. मालवण) : सुरेश श्यामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तथा शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्र्यांचे माजी स्वीय सहायक रामचंद्र आंगणे यांनी केले.

९९व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील; साताऱ्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू होणार संमेलन

प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जयवंत दळवींचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी : प्रा. अनिल सामंत

‘चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे,’ असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात बोलताना केले.