बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन!

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे. बालपणी बॅ. नाथ पै यांची अनेक रसाळ भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधी ज्यांना प्राप्त झाली, ते आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल लिहिलेला सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच नाथ पै यांची दशावतारी नाटकातील कलाकारांसंदर्भातील एक हृद्य आठवण ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओत सांगितलेली आहे.

Continue reading

रत्नागिरीत रंगला पहिलाच मराठी गझल मुशायरा

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जुन्याजाणत्या गझलकारांबरोबर नवोदित गझलकरांच्या एकापेक्षा एक गझलांनी रसिकांना अक्षरशः वेडे केले. गझलनवाज भीमराव पांचाळे यांची खास मुलाखतही चांगलीच रंगली.

Continue reading

एक तरी पुस्तक लिहावे

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निष्क्रियतेबाबत यापूर्वी या सदरात यापूर्वी अनेक वेळा मुद्दे मांडले होते. यावेळी मात्र एक सकारात्मक मुद्दा मांडण्याची संधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेने दिली आहे. गेली काही वर्षे सूप्तावस्थेत असलेल्या या शाखेचे अलीकडेच पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शाखेतर्फे विविध संकल्प जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यामध्ये आहे.

Continue reading

कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी अंक कोकणातल्या उत्सवांवर…; लेख आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन

वेगवेगळ्या दैवतांचे वैभवशाली पारंपरिक उत्सव हे कोकणाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी विशेषांक याच वैशिष्ट्याला वाहिलेला आहे. ‘कोकणातले उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रं मागवण्यात येत असून, सर्वोत्कृष्ट लेख आणि चित्रांना रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत. सविस्तर वाचा पुढे…

Continue reading

रत्नागिरीत चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे २९ जुलैपासून श्रावण कीर्तन सप्ताह

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन येत्या शुक्रवारपासून (दि. २९ जुलै) ते ४ ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे.

Continue reading

आदिवासी कुटुंबात जन्म, शिक्षिका ते राष्ट्रपतिपद – द्रौपदी मुर्मू यांचा प्रेरक प्रवास

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच (२५ जुलै २०२२) शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना शपथ दिली. मुर्मू यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा हा अल्प परिचय…

Continue reading

1 2 3 40