मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी रोजी जांबावली (गोवा) येथे होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी रोजी जांबावली (गोवा) येथे होणार आहे.
रत्नागिरी : येत्या १० आणि ११ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत शासकीय ‘ग्रंथोत्सव-२०२३’ होणार आहे.
रत्नागिरी : गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीतील गीता भवनात आज (२२ डिसेंबर) सकाळी चार तास संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण करण्यात आले. या पारायणात १२५हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत भारती या सहा संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : साहित्याची निर्मिती करताना केवळ करमणूक करणारे साहित्य अपेक्षित नसून समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक असलेल्या साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही भारतात हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न सुरूच आहे, असा सूर येथील प्रगतिशील साहित्य संमेलनातील परिसंवादात व्यक्त झाला.
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : नको मला चॉकलेट,
नको मला भेळ,
माझ्यासोबत कुणीतरी
खेळा थोडा वेळ… या आणि अशा कवितांनी प्रगतिशील साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बालमनाचा अचूक वेध घेतला.