कथा आणि गीतगायनातून उलगडला शिवइतिहास

रत्नागिरी : शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा अनुभवताना शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी शिवइतिहास उभा करताना शिवरायांइतकीच किंबहुना त्याहून अधिक जिजाऊंच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

ब्रिटनमध्ये असलेली शिवरायांची जगदंब तलवार आणि वाघनखे महाराष्ट्राला परत मिळणार; ब्रिटिश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अ‍ॅलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात १५ एप्रिलला मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आचरे गावातली रामनवमी… ‘पुलं’, कुमार गंधर्वांच्या सहभागाने पुलकित झालेली..

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील १९७५ सालचा रामनवमी उत्सव काही औरच होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ७० कलावंतांच्या सहभागामुळे तो त्रिशतसांवत्सरिक उत्सव अविस्मरणीय झाला. त्या उत्सवाच्या आठवणींबद्दल आचऱ्यातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…

‘पुलं’चे सुनीताबाईंना पत्र

‘पुलं’च्या निधनानंतर सुनीताबाईंनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्याला जर पुलंनी उत्तर दिले असते तर, असा विचार करून ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ. समिधा गांधी यांनी हे पत्र लिहिले होते.

अण्णा शिरगावकर नावाचा इतिहासपुरुष इतिहासजमा

कोकणच्या इतिहासाला नवा आयाम देणारे संशोधक अण्णा शिरगावकर यांना इतिहासाच्या एका अभ्यासकाने वाहिलेली श्रद्धांजली.

भारतीय ध्वजसंहिता – २००६

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाणार आहे. त्या निमित्ताने, भारतीय ध्वजसंहिता येथे प्रसिद्ध करत आहोत. तिरंगा फडकवताना या संहितेत दिलेले मुद्दे आवर्जून लक्षात ठेवावेत आणि भारतीय तिरंगा ध्वजाचा मान राखावा.