रत्नागिरीतील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे आज, २७ एप्रिल रोजी वार्धक्याने झाले. गेल्या १५ मार्च रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले होते.

सदाशिव टेटविलकर यांचा “गावगाडा” म्हणजे संदर्भग्रंथ

ठाणे : समाजव्यवस्था सुरळित चालण्यासाठी सामूहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पद्धती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असून सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरूप इतक्या सुंदर पद्धतीने आणि कुशलतेने रेखाटले आहे की, त्याचा उपयोग निश्चितच संदर्भग्रंथ म्हणून होईल, अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी. डी. कुलकर्णी यांनी शुभसंदेशाद्वारे व्यक्त केल्या.

‘‘मोडीदर्पण’मुळे घडतील मोडी लिपीचे नवे अभ्यासक’

मुंबई : ‘विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये आणि नवे मोडी अभ्यासक घडविण्यासाठी मोडीदर्पण दिवाळी अंक महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असे प्रशंसोद्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.

शंभरीच्या स्वातंत्र्यसैनिक : आशाताई पाथरे

महात्मा गांधींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात रत्नागिरीतील आशाताई पाथरे सहभागी झाल्या होत्या. १५ मार्च २०२० रोजी त्या शंभरीत पदार्पण करत आहेत. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आशाताईंना कारावास भोगावा लागला. त्या वेळच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. शंभरीत पदार्पण करणाऱ्या आशाताईंशी, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांनी साधलेला संवाद महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.

कुरतडे येथेही आढळली पुरातन कातळशिल्पे

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध लागला असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. कुरतडे (ता. रत्नागिरी) येथेही कातळामध्ये खोदलेल्या काही चित्रकृती निदर्शनाला आल्या असून, त्याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

पूर्वजांच्या पाषाणखुणांच्या शोधाची गोष्ट : कोकणातील कातळ-खोद-चित्रे

गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल अनेकांना कुतुहल आहे. हे शोधकार्य ज्या स्थानिक अभ्यासकांनी कुतुहलाने केले आणि हा ठेवा जगासमोर आणला, ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनीच मांडलेला हा शोधकार्याचा गूढरम्य प्रवास…