रत्नागिरीतील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे आज, २७ एप्रिल रोजी वार्धक्याने निधन झाले. १५ मार्च २०२१ रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण करून १०१व्या वर्षात पदार्पण केले होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या “चले जाव” चळवळीत १९४२ साली त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात असताना आणि पुण्यात मिनू मसानी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. गेली सात वर्षे त्या जामनगर येथे त्यांच्या कन्या अरुंधती राजा यांच्याकडे राहत होत्या. तेथेच त्यांचे आज दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी श्रीमती पाथरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

(आशाताईंनी १००व्या वर्षात पदार्पण केलं, त्या वेळी त्यांच्याविषयी लिहिलेला सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. १५ मार्च २०२१ रोजी साजऱ्या झालेल्या त्यांच्या वाढदिवसाचा, तसंच त्यांनी देशवासीयांना दिलेल्या संदेशाचा व्हिडिओ सोबत देत आहोत. आशाताईंच्या आवाजातील संदेश ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply