चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; मदतपथके तैनात

चिपळूण : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुसळधार वृष्टी सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या स्थितीनुसार, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातील नाईक कंपनी/मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी एक फूट पाणी भरलेले आहे.

रत्नागिरीतील फोटो, व्हिडिओग्राफर्सच्या कार्यशाळेत १०० जणांचा सहभाग

रत्नागिरी : येथे फोटो, व्हिडिओग्राफर्सच्या कार्यशाळेत १०० जणांनी सहभाग घेऊन आधुनिक युगातील फोटोग्राफीची तंत्रे जाणून घेतली. रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर व्यावसायिकांची सहकारी संस्था, कोल्हापूर येथील सुभाष फोटोज आणि सोनी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पां. वा. काणेंच्या समग्र अभ्यासाची गरज : भिकुजी इदाते

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यांच्या स्मारकाकरिता स्थापन झालेल्या समितीमुळे हे काम पुढे जाईल, असा विश्वास पद्मश्री भिकूजी ऊर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केला.

दापोलीत ८ मे रोजी भारतरत्न पां. वा. काणे स्मारकाचा पहिला वर्धापनदिन

दापोली : येथे स्थापन झालेल्या महामहोपाध्याय भारतरत्न पां. बा. काणे स्मारक समितीचा पहिला वर्धापनदिन येत्या ८ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विशेष गौरव समारंभही आयोजित करण्यात आला आहे.

फोटोग्राफर असोसिएशनतर्फे वेडिंग फोटोग्राफीविषयी कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वेडिंग फोटोग्राफी या विषयावर खेड आणि लांजा येथे मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकातर्फे दरमहा वाचक कट्टा कट्ट्याचे आयोजन

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उद्यापासून (दि. १४ जानेवारी) वाचक कट्ट्याचे आयोजन सुरू करण्यात येणार आहे.