रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वेडिंग फोटोग्राफी या विषयावर खेड आणि लांजा येथे मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
निकॉन इंडिया लिमिटेड आणि रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन पुरस्कृत बालाजी मीडिआच्या सहकार्याने, खेड तालुका फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स असोसिएशनतर्फे खेड येथे आणि लांजा तालुका फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशनतर्फे लांजा येथे तसेच चिपळूण, गुहागर, मंडणगड, दापोली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर तालुका असोसिएशनच्या सहकार्याने कार्यशाळा होणार आहेत. नामांकित प्रशिक्षक भूषण पाटील यांची वेडिंग फोटोग्राफी या विषयावरील ही मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. खेड येथे २० मार्च रोजी वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजीनगर येथे राजा शिवछत्रपती मराठा भवन येथे कार्यशाळा होईल. त्याकरिता नावनोंदणी करण्यासाठी खेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब सासणे (9883011818) यांच्याशी संपर्क साधावा. लांजा येथील शहनाई हॉलमध्ये २१ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यशाळा होईल. तेथील नावनोंदणीसाठी लांजा तालुकाध्यक्ष प्रवीण पाटोळे (9890666878) यांच्याशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष संजय शिंदे (9404992589), कांचन मालगुंडकर (8999332757), गुरू चौगुले (9730414447), सुरेंद्र गीते (9422432336), संदेश टिळेकर (9370769436) किंवा संतोष आग्रे (9403505626) यांच्याशी संपर्क साधावा.
व्यावसायिक फोटोग्राफरसाठी प्रवेश विनामूल्य आहे. जास्तीत जास्त व्यावसायिक फोटोग्राफरनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनने केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड