रत्नागिरी : शेगाव येथील राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी संघटनेच्या वतीने जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
नोकरी, व्यवसाय, शिक्षणाकरिता कोकणातील खान्देशात तसेच खान्देशातील कोकणात अनेक नागरिक कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा संस्थान साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून असंख्य भाविक येत असतात. कोकण रेल्वे मार्गावरून शिर्डी, जळगाव येथे रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा अशा रेल्वेची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सौ. शबनम शेख, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार व्यास, शेगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर नागपाल, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगावकर, राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे ठाणे आणि कुडाळचे तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी यांनी ही गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविला आहे. त्याच्या प्रती केंद्रीय रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, तसेच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनाही पाठविल्या आहेत. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुंबीतल महाप्रबंधक तसेच जळगावचे खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याकडे निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.
ही मागणी मान्य झाली, कोकणवासीयांना शिर्डी येथे कमी खर्चात आणि कमी त्रासात थेट जाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड