महाराष्ट्र सरकारने लंडनमधील लिलावात जिंकली शूर मराठा सरदार रघूजी भोसले यांची तलवार

मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघूजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार लंडनमध्ये जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. १८ ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.

नागपूर-मडगाव रेल्वेगाडीला २९ डिसेंबरपर्यंत मुदवाढ

रत्नागिरी : नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या प्रतीक्षा द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीला येत्या २९ डिसेंबर २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी २९ सप्टेंबरपर्यंत धावणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते खान्देश मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या नागपूर मडगाव प्रतीक्षा द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना त्यामुळे आणखी एक गाडी उपलब्ध झा्ली आहे.

नागपूर मडगाव प्रतीक्षा एक्स्प्रेसला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : नागपूर-विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान कोकण रेल्वेमार्गाने धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ही गाडी ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर विशेष १५६ गाड्या

रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य रेल्वेतर्फे १५६ गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये संपूर्ण अनारक्षित गाडीचाही समावेश आहे. अनारक्षित गाडी वगळता अन्य सर्व गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण २७ जूनपासून सुरू होणार आहे.

कोकण रेल्वेमार्गे चेन्नई-जोधपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

नवी मुंबई : चेन्नईजवळील ताम्बरम रेल्वे जंक्शन ते राजस्थानमधील जोधपूरपर्यंत धावणारी विशेष सुपरफास्ट गाडी कोकण रेल्वे मार्गे दि. २७ एप्रिल आणि ४ मे २०२३ रोजी धावणार आहे.