कोकण रेल्वेमार्गे चेन्नई-जोधपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

नवी मुंबई : चेन्नईजवळील ताम्बरम रेल्वे जंक्शन ते राजस्थानमधील जोधपूरपर्यंत धावणारी विशेष सुपरफास्ट गाडी कोकण रेल्वे मार्गे दि. २७ एप्रिल आणि ४ मे २०२३ रोजी धावणार आहे.

यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ताम्बरम – जोधपूर गाडी (क्र. 06055) २७ एप्रिल तसेच ४ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता सुटेल. ही गाडी मडगाव येथे दुसऱ्या दिवशी (२८ एप्रिल आणि ५ मे) रोजी सकाळी ११.३५ वाजता येईल. तेथून ती थेट रत्नागिरीला थांबणार असून रत्नागिरीतून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल. कोकणातील अन्य स्थानकांचे या गाडीचे वेळापत्रक असे – चिपळूण सायंकाळी ५.५०, रोहा रात्री ८.२०, पनवेल रात्री ९.३०, वसई रात्री ११.४५. ही गाडी तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी राजस्थानात जोधपूर येथे पोहोचेल. गाडीचा एकूण प्रवास ५१ तास २० मिनिटांचा असून गाडी ३९ स्थानकांवर थांबेल.

परतीच्या प्रवासात जोधपूर येथून ही गाडी (क्र. 06056) ३० एप्रिल तसेच ७ मे २०२३ रोजी तांबरम स्थानकासाठी सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल. मात्र ही गाडी पनवेल (दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५) येथून सुटल्यानंतर थेट मंगलुरू (तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता) येथे थांबणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील एकाही स्थानकावर ती गाडी थांबणार नाही. तिसऱ्या दिवशी ती तांबरम् जंक्शनला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल. गाडीचा एकूण प्रवास ४९ तास ५० मिनिटांचा आहे. या प्रवासात ही गाडी केवळ आठ स्थानकांवर थांबणार आहे.

या गाडीला एकूण २२ एलएचबी कोच असतील. यात टू टायर एसी – १ डबे, थ्री टायर एसी – ८ डबे, स्लीपर – ५ डबे, जनरल – ६ डबे, जनरेटर कार – १, एसएलआर – १ अशी डब्यांची रचना असेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply