रत्नागिरीतील फोटो, व्हिडिओग्राफर्सच्या कार्यशाळेत १०० जणांचा सहभाग

रत्नागिरी : येथे फोटो, व्हिडिओग्राफर्सच्या कार्यशाळेत १०० जणांनी सहभाग घेऊन आधुनिक युगातील फोटोग्राफीची तंत्रे जाणून घेतली. रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर व्यावसायिकांची सहकारी संस्था, कोल्हापूर येथील सुभाष फोटोज आणि सोनी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

फोटोग्राफी क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. व्हिडिओग्राफर्सना थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम, बातम्या, यूट्यूबर, म्युझिक अल्बम, डॉक्युमेंटेशन, व्हॉगर्स अशा विविध प्रकारच्या संधी आहेत. रत्नागिरीमध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे आहेत. त्यांना या माध्यमातून प्रसिद्धी देता येईल. या नव्या संधींचे रत्नागिरीतील व्हिडिओग्राफर्सनी सोने करावे, असे आवाहन सोनी कंपनीचे सी प्रो स्पेशालिस्ट सुनील गवई यांनी येथील सिल्व्हर स्वॅन हॉटेलमध्ये झालेल्या या वर्कशॉपध्ये केले. यापुढेही अशा पद्धतीची अनेक वर्कशॉप रत्नागिरीत आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अजय बाष्टे यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या हस्ते सर्व मान्यवर, मार्गदर्शकांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी टेक्निकल एक्स्पर्ट सुधाकर सिंग यांनी सोनी कंपनीचे मिररलेस कॅमेरे, वेडिंग व प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये कसे वापरायचे याचे प्रॅक्टिकलसह मार्गदर्शन केले. तांत्रिक माहिती दिली. पूर्वी फोटोग्राफी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संशोधनाद्वारे सोनी कंपनीने नवनवीन कॅमेरे बनवले आहेत. दहा वर्षांपूर्वी पहिला मिररलेस कॅमेरा बाजारात आणला. त्यानंतर सुधारणा करत करत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित आणि आता तर एआय तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग कॅमेऱ्यात केला जात असल्याने फोटोग्राफी अधिक कलात्मक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

…….
रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्था, सुभाष फोटोज आणि सोनी कंपनी आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत सहभागी फोटोग्राफर्स.

सोनी कंपनीचे सी प्रो स्पेशालिस्ट सुनील गवई यांनी सोनी कंपनीचे व्हिडिओ कॅमेरे लाइव्ह आणि प्रोफेशनली कसे वापरायचे, याबाबत मार्गदर्शन केले. या वर्कशॉपसाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूणसह अन्य तालुक्यातील १०० हून अधिक फोटोग्राफर्स उपस्थित होते. वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी सोनी इंडियाचे अभिजित पाबरेकर, सुधाकर सिंग, सुनील गवई, सुभाष फोटोजचे संचालक शंभू ओऊळकर, फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर व्यवसायिकांची सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे, साईप्रसाद पिलणकर, नीलेश कोळंबेकर, परेश राजिवले, अमित आंबवकर आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply