नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील वीर ते खेड या भागातील डागडुजीच्या कामासाठी येत्या ७ जुलै रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.
येत्या शुक्रवारी (दि. ७ जुलै) दुपारी १२ वाजून २० मिनिटांपासून दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत वीर आणि खेड या दोन स्थानकांदरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे काही गाड्यांना विलंब होणार आहे.
गाडी क्र. 20910 पोरबंदर कोचुवेली एक्स्प्रेस गाडी १ तास ५० मिनिटे रोहा आणि वीर स्थानकांदरम्यान थांबणार आहे.
गाडी क्र. 16345 एलटीटी-थिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडीही ५० मिनिटांसाठी रोहा आणि वीर स्थानकांच्या दरम्यान थांबणार आहे.
गाडी क्र. 10106 सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस गाडी एक तासासाठी रत्नागिरी आणि खेड स्थानकांदरम्यान, तर गाडी क्र. 12431 थिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दिन राजधानी एक्स्प्रेस गाडी अर्ध्या तासासाठी रत्नागिरी आणि खेड स्थानकांच्या दरम्यान थांबणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

