कोकणातील सर्वांत मोठ्या दीपोत्सवात १७ हजार ७७७ दीप प्रकाशमान

लांजा : चराचरात लखलखणारा प्रकाश साठवून ठेवण्याची प्रेरणा देणार्‍या दीपावलीचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन लांजा येथील फ्रेंड्स ग्रुपने सलग १७ व्या वर्षी कोकणातील सर्वांत मोठा आणि महाराष्ट्रातील तृतीय क्रमांकाचा दीपोत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी १७ हजार ७७७ दीप प्रज्वलित करण्यात आले.

लांज्याच्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे पावसच्या वृद्धाश्रमात ब्लँकेट, फराळ वाटप

लांजा : येथील संस्कृती फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्वरबहार दिवाळी संगीत संध्येला लांजावासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. श्री देव चव्हाटा मंदिरामध्ये ही संगीतसंध्या झाली.

संस्कृती फाउंडेशनच्या ‘स्वरबहार’ संगीत संध्येला लांजावासीयांचा प्रतिसाद

लांजा : येथील संस्कृती फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्वरबहार दिवाळी संगीत संध्येला लांजावासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. श्री देव चव्हाटा मंदिरामध्ये ही संगीतसंध्या झाली.

रत्‍नागिरीच्या समितीला राजभाषेचा सर्वोच्‍च ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्‍कार

रत्नागिरी : रत्‍नागिरी नगर राजभाषा कार्यान्‍वयन समितीला राजभाषेचा प्रथम क्रमांकाचा सर्वोच्‍च ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्‍कार मिळाला आहे. गुजरातमधील सुरत येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

धर्म ही संकल्पना भारतीय विचारांच्या केंद्रस्थानी – डॉ. कला आचार्य

रत्नागिरी : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. विविध ग्रंथ, ठिकाणे आणि अर्थाची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत, असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्य यांनी केले.

रत्नागिरीत कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती या विषयावरील ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे. यामध्ये भारतासह परदेशातील तज्ज्ञसुद्धा सहभागी होणार आहेत.