संस्कृती फाउंडेशनच्या ‘स्वरबहार’ संगीत संध्येला लांजावासीयांचा प्रतिसाद

लांजा : येथील संस्कृती फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्वरबहार दिवाळी संगीत संध्येला लांजावासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. श्री देव चव्हाटा मंदिरामध्ये ही संगीतसंध्या झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेश गोसावी उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, गावकर विठोबा लांजेकर, बाबाशेठ लांजेकर, मुस्लिम वेल्फेअर संघटना अध्यक्ष अखिल नाईक, ग्रामसेवक युनियनचे सचिव सुबोध कीर, बांधकाम उपअभियंता विजय सोळगावकर, दादा बावधनकर, वीरशैव समाज अध्यक्ष मोहन तोडकरी, मार्गदर्शक विजय खवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी राजेश गोसावी लिखित व दिग्दर्शित ‘मयूरी’ या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण झाले. कार्यक्रमाची सुरवात आस्था खेडकरच्या सूर निरागस हो या नृत्याने झाली. यानंतर पंचतुंड ही नांदी सादर झाली. शैलेश शिंदे यांनी करूया उदो उदो अंबाबाईचा, मधुरा लाकडे-रसिका तांबे यांनी आली माझ्या घरी ही दिवाळी, संदीप संसारे यांनी बीज अंकुरे अंकुरे, राजेश गोसावी यांनी आई माझी कोणाला पावली, रासिका तांबे यांनी खंडोबाची कारभारीन, रणजित झोरे यांनी जीना फाटलया, गुरू नांदगावकर राजेश गोसावी-रसिका तांबे हृदयी वसंत फुलताना, रामदास चव्हाण यांनी पाहिले न मी तुला, रसिका तांबे यांनी नटले तुमच्यासाठी, मधुरा लाकडे, शुभांगी मुळे, रसिका तांबे, स्नेहल पांचाळ यांनी झुलवा पाळणा, अभय पाध्ये यांनी हरी म्हणा, अक्षय साखळकर यांनी कानडा राजा, वंश कुरूप याने दिवाळी गीत, गांधी यांनी मनाच्या धुंदीत अशी सुंदर गीते सादर केली.

कुणाल पाटील आणि मधुरा मीना यांनी बहारदार लावणी नृत्ये सादर केली. मीना खेडकर, आस्था खेडकर यांनीदेखील अप्रतिम बहारदार नृत्ये सादर केली. महेशकुमार मयेकर व बालकलाकर वेदांत गोसावी यांच्या मिमिक्रीने रसिकांची मने जिंकली. योगेश शेट्ये यांनी उत्तम निवेदनाद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

संगीतसाथ सिंथेसायजर राजू किल्लेकर, ढोलक ढोलकी केदार लिंगायत, पखवाज मंदार जाधव, ढोलकी कौस्तुभ सुतार, ऑक्टोपॅड सुयोग कांबळे, हार्मोनियम शंकर मुळे, ध्वनी व प्रकाशव्यवस्था सौरभ कवचे यांनी पाहिली. शीतल डांगे आणि परेश दळी यांच्या रांगोळीने सर्वांना खुश केले. कार्यक्रमाला लोकमान्य वाचनालयाचे माजी अध्यक्ष विजय नारकर, आकांक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई, उपाध्यक्ष राजू धावणे, लांजा नागरी पतपेढी सहकारी संस्थेचे चेअरमन सचिन भिंगार्डे, माघी गणेशोत्सव मंडळाचे संतोष खवळे, शिक्षक नेते दीपक नागवेकर, संगीतप्रेमी प्रदीप कांबळे, प्रशांत कापडी, गुरुदास शेट्ये, मापारी, नितीन गोसावी, सुनील अभ्यंकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक राजेश गोसावी, अध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, संघटक प्रियंवदा जेधे, सिद्धेश पांचाळ, स्पर्धा प्रमुख राहुल तोडकरी, प्रसिद्धी प्रमुख दिनेश बेनकर, सचिव विनोद बेनकर, सदस्य पालवी गोठणकर, प्रजाप माने, प्रकाश पांचाळ, रूपेश पांचाळ, संतोष शेट्ये, सचिन पांचाळ, श्रीकांत बोंबले, अभी गांधी आदींनी मेहनत घेतली.

सलग दहा वर्षे अशा प्रकारचे सांगीतिक उपक्रमाचे उत्तम आयोजित करून लांजा तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे लांजावासीयांकडून कौतुक केले जात आहे.


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply