रत्नागिरी : आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे संस्कृत भाषा आपल्याला सांगते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे संस्कृत भाषा आपल्याला सांगते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे उद्घाटन शनिवार, २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
मुंबई : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथसंपदेचे नुकत्याच झालेल्या महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथ भेट दिले.
रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) येथील धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे (ता. चिपळूण) येथे सिद्धिविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील २४ जणांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे घरे सुपूर्द करण्यात आली.
रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दोन ते आठ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्याससह जिल्हा प्रवेश बंदी करण्याचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी ब्रेक दे चेनअंतर्गत लागू केलेली टाळेबंदी येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहे.