सोडावॉटरच्या काचांचा चष्मा सोडवायचाय? इन्फिगो आहे ना!

रत्नागिरी : सोडावॉटरच्या काचा किंवा बहिर्गोल भिंगाप्रमाणे जाड काचांच्या चष्मा वापरताना खूपच त्रास सोसावा लागतो. हा त्रास अनेकांना होत असतो. रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने अशा अनेकांना नवी दृष्टी दिली.

Continue reading

दृष्टीबरोबरच दृष्टिकोन देणारा डॉक्टर – डॉ. श्रीधर ठाकूर

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीतील पंधराव्या हॉस्पिटलचं उद्घाटन रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी झालं. मुंबईतल्या नेत्र रुग्णालयाच्या साखळीतलं एक हॉस्पिटल रत्नागिरीत सुरू झालं असलं तरी ते मूळच्या कोकणवासीयाने सुरू केलं आहे, हे त्याचं विशेष. हे वैशिष्ट्य जपणाऱ्या, रुग्णांना दृष्टी देणाऱ्या आणि औपचारिक तसंच अनौपचारिक संवादाद्वारे समाजालाही दृष्टिकोन देणारे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांचा १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचं अभीष्टचिंतन!

Continue reading