फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मानभावीपणाची मागणी

भ्रष्टाचार रोखण्याचे कायदे कडक करण्याची मागणी होत असताना लाच घेताना किंवा अन्य कोणत्याही गुन्ह्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पकडले गेले, तर त्यांचे नाव आणि छायाचित्र जाहीर करू नये. त्यांची ओळख लपवावी, अशी मागणी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही मागणी खरेच आश्चर्यकारक आणि मानभावीपणाची, साळसूदपणाची आहे.

धाराशिवचा उस्मानाबादपर्यंतचा प्रवास कसा आणि कधी झाला?

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील “उस्मानाबाद”चे “धाराशिव” असे नामांतर करण्यास मान्यता दिली आणि पुन्हा एकदा धाराशिव हे नाव चर्चेत आले. मुळात धाराशिवचा उस्मानाबादपर्यंतचा प्रवास कसा आणि कधी झाला, याची माहिती मनोरंजक आहे.

आणखी एक महामंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लोककलांसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा लोककला महोत्सवात केली. आता यथावकाश हे महामंडळ स्थापन होईलच. महामंडळाची घोषणा केली किंवा ती प्रत्यक्षात आली तरी सारे काही झाले, असे नाही. कोकणापुरता विचार करायचा झाला तरी कोकणासाठी अनेक महामंडळे आतापर्यंत अस्तित्वात आली. काही बरखास्त झाली, तर अस्तित्वात असलेली महामंडळे बंद झाली नाहीत, म्हणून चालू आहेत, अशा अवस्थेत आहेत.

कोकणी लोककलांसाठी महामंडळ स्थापण्याबद्दल सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री शिंदे

‘कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रीतीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरणाची मुख्यमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.