रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्गात ३४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ ऑक्टोबर) १७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८२१३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३४ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ४५८० झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत प्लाझ्मा उपचार केंद्र सुरू; जिल्हा रुग्णालयात असे केंद्र झालेला पहिला जिल्हा

रत्नागिरी : करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे अस्त्र असलेल्या प्लाझ्मा थेरपीचे केंद्र आता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू झाले आहे. प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा १८ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

Continue reading

रत्नागिरीत १८, सिंधुदुर्गात २७ नवे करोनाबाधित; रत्नागिरीत २४ तासांत एकही मृत्यू नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ ऑक्टोबर) १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. अशी परिस्थिती बरेच दिवसांनी आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ४५४७ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरी-सिंधुदुर्गात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ ऑक्टोबर) फक्त १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच आज ८७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३० नवे रुग्ण आढळले असून, ५७ जण करोनामुक्त झाले आहेत.

Continue reading

रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात १९ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज नव्या २२ रुग्णांची नोंद आज (१५ ऑक्टोबर) झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८१६६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १९ रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४४९० झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत ७९, तर सिंधुदुर्गात ३७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणात गेले काही दिवस घट झाली होती; मात्र त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. नव्या ७९ रुग्णांची नोंद आज (१४ ऑक्टोबर) झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८१४४ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३७ रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४४७२ झाली आहे.

Continue reading

1 2 3 4 5 37