मास्क नसेल, तर पोलीसही ठोठावू शकतील ५०० रुपयांचा दंड

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक संचारबंदीबाबत तूर्त कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र येत्या सात-आठ दिवसांमध्ये सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे अशी आवश्यक ती खबरदारी लोकांनी घेतली, तर संचारबंदीची वेळ येणार नाही. ती येऊ नये यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीत ३, तर सिंधुदुर्गात दसपट ३० जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ जानेवारी) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण आढळले, तर ३० रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाचा करोनामुळे मृत्यू झाला.

रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्गात २२ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जानेवारी) करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले, तर १७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २३ नवे रुग्ण आढळले, तर २२ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात एकाचा करोनामुळे मृत्यू झाला.

करोनाचे रत्नागिरीत नऊ, तर सिंधुदुर्गात १३ नवे रुग्ण

री/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ जानेवारी) करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ नवे रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरीत दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात प्रत्येकी दोघांचा करोनामुळे मृत्यू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सोमवारी) करोनाचे नवे ६ रुग्ण आढळले, तर १४ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवा १ रुग्ण आढळला, तर एकही रुग्ण करोनामुक्त होऊन घरी जाऊ शकला नाही. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला.

रत्नागिरीत ९, सिंधुदुर्गात करोनाचे नवे ६ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (रविवारी) करोनाचे नवे ९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले. रत्नागिरीत आज एकही रुग्ण करोनामुक्त होऊन घरी जाऊ शकला नाही. सिंधुदुर्गात तिघे जण करोनामुक्त झाले.