रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्गात २२ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जानेवारी) करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले, तर १७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २३ नवे रुग्ण आढळले, तर २२ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात एकाचा करोनामुळे मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि खेडमध्ये प्रत्येकी १, तर चिपळूणमध्ये ८ बाधित रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरीत २, तर खेड आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १४). एकूण रुग्णांची संख्या आता ९३६० झाली आहे. आज आणखी ९६४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६३ हजार १७१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०६ आहे. त्यातील सर्वाधिक ३१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत.

आज एकाही मृताची नोंद झालेल नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३३८ एवढीच असून मृत्युदर ३.६१ टक्के आहे. जिल्ह्यात आज १७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८८९३ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९५.०१ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, सिंधुदुर्गात आज २३ नवे करोनाबाधित आढळले, तर २२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६०१९ एवढी झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५६१५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील ३४ वर्षीय तरुणाचा आज करोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यासह जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply