करोनाचे रत्नागिरीत नऊ, तर सिंधुदुर्गात १३ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ जानेवारी) करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ नवे रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरीत दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार चिपळूणमध्ये ४, तर रत्नागिरी आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरीत २, तर चिपळूणमध्ये १ बाधित रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून ९). एकूण रुग्णांची संख्या आता ९३४६ झाली आहे. आज आणखी ४३१ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६२ हजार २०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०५ आहे.

१० जानेवारीला राजापुरातील ४२ वर्षीय पुरुषाचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याची नोंद आज झाली. तसेच १२ जानेवारी रोजी रत्नागिरीतील ५५ वर्षांच्या महिलेचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३३८ झाली असून, मृत्युदर ३.६१ टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८८७६ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.९७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, सिंधुदुर्गात आज १३ नवे करोनाबाधित आढळले, तर चार जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५९९६ एवढी झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५९३ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६३ असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply