रत्नागिरीत ३, तर सिंधुदुर्गात दसपट ३० जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ जानेवारी) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण आढळले, तर ३० रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाचा करोनामुळे मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत २, तर चिपळूणमध्ये ३ बाधित रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार दापोली आणि चिपळूणमध्ये रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून ७). एकूण रुग्णांची संख्या आता ९३६७ झाली आहे. आज आणखी १९१ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६३ हजार ३६२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०९ आहे. त्यातील सर्वाधिक ३४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत.

चिपळूणमध्ये ६१ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३३९ झाली असून मृत्युदर ३.६२ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ३ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८८९६ झाली आहे. बरे झालेल्यांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने करोनामुक्तीचा कालच्या तुलनेत किंचित घटला असून तो ९४.९७ टक्के झाला आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, सिंधुदुर्गात आज १२ नवे करोनाबाधित आढळले, तर ३० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६०३१ एवढी झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५६४५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply