रत्नागिरीत ९, सिंधुदुर्गात करोनाचे नवे ६ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (रविवारी) करोनाचे नवे ९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले. रत्नागिरीत आज एकही रुग्ण करोनामुक्त होऊन घरी जाऊ शकला नाही. सिंधुदुर्गात तिघे जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज एकही रुग्ण बरे जाऊ शकला नाही. त्यामुळे करोनामुक्तांची संख्या आठ हजार ८५१ एवढीच राहिली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.८५ टक्के आहे.

जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत २, तर चिपळूणमध्ये ५ आणि रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरीत २ बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ९). एकूण रुग्णांची संख्या आता नऊ हजार ३३१ झाली आहे. आज आणखी १२८ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६१ हजार ६९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज एकही मृत्यू नोंदविला गेला नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३३४ एवढीच राहिली असून मृत्युदर ३.५७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने करोनाचे सहा रुग्ण आढळले, तर तिघांनी करोनावर मात केली. एकूण पाच हजार ५८९ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाबाधितांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्युदर राज्याच्या तुलनेपेक्षा जास्त, तर करोनामुक्तीचा दर कमी आहे. सावंतवाडी तालुक्या्त सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, तर कणकवली तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत पाच हजार ९७० रुग्ण जिल्ह्यात आढळले असून त्यापैकी १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतचे तालुकानिहाय करोनाबाधित रुग्ण असे – देवगड- ४२४, दोडामार्ग- ३४०, कणकवली-१८१७, कुडाळ- १३३२, मालवण- ५१६, सावंतवाडी- ८१४, वैभववाडी- १७८, वेंगुर्ले- ५२९. जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्ण – देवगड २५, दोडामार्ग २१, कणकवली ४१, कुडाळ ४३, मालवण २९, सावंतवाडी १८, वैभववाडी ८, वेंगुर्ले २४. जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांचा त्यात समावेश आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply