अंजनवेल ग्रामपंचायतीने करोनासाठी उभारले स्वतंत्र आरोग्य उपचार केंद्र

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी करोना प्रादुर्भावाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी ग्रामस्थांकरिता मोफत स्वतंत्र आरोग्य उपचार केंद्र उभारले आहे. तेथे औषधांबरोबर एमबीबीएस, बालरोगतज्ज्ञाची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनवेल ग्रामपंचायतीने करोनाच्या काळात आणखी एक आदर्श उपक्रम राबविला आहे.

Continue reading

मदत वाटपाच्या समन्वयासाठी स्वयंसेवक हवेत

नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रामुख्याने घरे अंशतः बाधित झालेल्यांसाठी निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. शासनाच्या

Continue reading

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नव्या निकषांनुसार अधिक भरपाई : उदय सामंत

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई दिली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील आपद्ग्रस्तांना त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२४ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) मुंबईतून घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. खासकरून अंशतः बाधितांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याने भरपाईपासून वंचित राहणाऱ्या हजारो आपद्ग्रस्तांना भरपाई मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Continue reading